पुलक मंच परिवाराद्वारे महिला दिवसाचे भव्य आयोजन

jain mahila कर्तृत्ववान, प्रेरक महिलांचा सत्कार

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
नागपूर,
 
jain mahila अखिल भारतीय पुलक मंच परिवार, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच, शाखा महावीर वार्ड, नागपूरद्वारे जागतिक महिला दिनाचे भव्य आयोजन ग्रेट नाग रोड, महावीरनगर येथील श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंदकुंद शिक्षण संस्थेच्या संचालक जयश्री नखाते होत्या. jain mahila मुख्य अतिथी उच्च न्यायालयाच्या ॲड. मंजीत मतानी, समाजसेविका उषा पनवेलकर, अतिथी राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रिचा जैन, वैशाली कोहळे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
 
 
jain
 
jain mahila याप्रसंगी कर्तृत्ववान, प्रेरक महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर स्मार्ट सिटीच्या महाप्रबंधक डॉ. प्रणिता उमरेडकर, कवयित्री चित्रा कहाते, क्रीडा शिक्षिका अर्चना कोट्टेवार, धार्मिक कार्यासाठी डॉ. विमला जैन, परिश्रमपूर्वक यशस्वी होणाऱ्या उज्वला नेटके, संघर्ष करून पुढे जाणारी आकांक्षा झाडे यांचा समावेश होता. jain mahila अतिथींच्या हस्ते शाल, धर्म दुपट्टा, मोत्यांची माळ, साखरेची गाठी, पुस्तक, सन्मान पत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी लांबाडे, मनीषा शहाकार यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन व आभार प्रदर्शन महिला मंचाच्या प्रतिभा नखाते यांनी केले. jain mahila कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंचाच्या अध्यक्षा कल्पना सावळकर यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय ममता रणदिवे, मनीषा शहाकार, शीला भांगे, ज्योती भुसारी, प्रिया बंड, प्रतिमा सावरकर यांनी करून दिला. jain mahila मनमोहक नृत्य प्रस्तुतीधनश्री कापसे व महिला मंचाच्या सदस्यांनी दिली. स्वागतगीत महिला मंचच्या सदस्यांनी सादर केले.
 
 
याप्रसंगी संवाद साधतांना ॲड. मंजीत मतानी म्हणाल्या महिलांना परिभाषित करता येत नाही. jain mahila महिलांना प्रताडित केल्या जाते. महिला जर एकजूट असतील तर त्यांना कोणतीच शक्ती हरवू शकणार नाही. स्मार्ट सिटीच्या महाप्रबंधक डॉ. प्रणिता उमरेडकर म्हणाल्या, सक्षम समाज करण्याचे काम आपण करतो. jain mahila कुटुंब जगेल तर देश जगेल. परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही. परिवारात समन्वय असला पाहिजे, समन्वयाने सासू सूनेमधील नाते वृध्दींगत होईल. jain mahila यावेळी नागपूरच्या विविध ५० महिला मंडळांच्या प्रतिनिधींना विशेष सन्मानित करण्यात आले.
 
 
सौजन्य : रमेश उदेपूरकर, संपर्क मित्र