अंजनगावात 285 पोते तांदूळ जप्त

23 Mar 2023 21:32:31
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी,
येथून जवळच असलेल्या नारायणपूर येथील Anjangaon एका गोदामात अवैध मार्गाने साठवूण ठेवलेला 285 पोते तांदूळ पुरवठा विभाग व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. ही कारवई गुरूवार 23 मार्च रोजी सांयकाळी करण्यात आली. या कारवाईने काळाबाजार करणार्‍याचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
 
Anjangaon
 
तहसीलदारांनी पुरवठा निरीक्षकांना या संदर्भातील माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी पोलिस निरीक्षक दिपक वानखडे व सहकार्‍यांना सोबत घेऊन Anjangaon नारायणपुर येथील मस्जिद जवळ असलेल्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी एक इसम एमएच 27 एक्स 8159 क्रमांकाच्या बोलेरो पीकअप वाहनातले तांदूळाचे पोते गोदामात ठेवत होता. त्याची चौकशी केल्यावर त्याने पोलिसांना मिर्झा गुफरान उर्फ मुन्ना मुस्तफा बेग रा. नारायणपुर असे नाव सांगितले. लगेच पथकाने बोलेरो वाहन व गोदामाची तपासणी पंचासमक्ष सुरू केली. तपासणीत तांदळाने भरलेले एकुण 285 पोते आढळून आले. सखोल चौकशी केल्यावर सदर व्यक्तीकडे साडवणूकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही.
 
 
खरेदी व विक्रीच्या पावत्याही त्याच्याकडे नव्हत्या. चौकशीअंती ही साठवणूक अवैध असल्याचे स्पष्ट झाले. हा तांदुळ चिल्लर स्वरुपात व्यापारी व ईतरांकडुन खरेदी केल्याचे मुस्तफा बेग याने पथकाला सांगितले. 285 पोत्यांमध्ये 154.50 क्वींटल तांदूळ होता. त्याचे बाजार मुल्य अंदाजे 6 लाख 63 हजार 390 रुपये आहे. हा Anjangaon सर्व तांदूळ व पाच लाख किंमतीचे बेलोरा वाहन असा एकुण 11 लाख 63 हजार 390 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिर्झा गुफरान उर्फ मुन्ना मुस्तफा बेग याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या धंद्यात आणखी काही मंडळी सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.
Powered By Sangraha 9.0