अखिलेश यादव माझी हत्या करू शकतात!

23 Mar 2023 13:09:43
लखनौ,
Akhilesh Yadav उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सपा प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या मनात ‘विष’ आहे आणि त्यामुळे त्यांची ‘हत्या’ही होऊ शकते, असा आरोप त्यांनी गुरुवारी केला. या संदर्भात बोलताना मौर्य यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना एका प्रश्नावर सांगितले की, "माझा विश्वास आहे की, त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप विष आहे.
 
yadav
  
केशव प्रसाद मौर्य यांनी यादव यांना पक्षाकडे लक्ष देण्याचा सल्ला देत म्हटले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा सफाया होईल, पण पक्षाच्या कामाकडे लक्ष द्या आणि अशी विधाने करून त्यांना आता काहीही मिळणार नाही आणि  होणार नाही. Akhilesh Yadav त्यांच्या नेतृत्वाखाली,सपाने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 100 हून अधिक जागा जिंकल्या, ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती, परंतु आता त्यांच्या पतनाची वेळ आली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्याला तुरुंगात पाठवू इच्छित होते या अखिलेश यादव यांच्या दाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री म्हणाले, जे चुकीचे करतात त्यांना तुरुंगात जावे लागेल. मला आतापर्यंत त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. अशी विधाने करून सहानुभूती मिळवण्यापेक्षा त्यांनी आपल्या पक्षावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
Powered By Sangraha 9.0