अंबादेवी चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ

23 Mar 2023 21:35:25
तभा वृत्तसेवा
अमरावती,
विदर्भ कुलस्वामिनी (Ambadevi Chaitra Navratri festival) श्री अंबादेवी मंदिरात चैत्र नवरात्रौत्सवाला उत्साहाने सुरुवात झाली असून 22 मार्चला सकाळी 5 वाजता संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे ह्यांच्या हस्ते श्री देवीचा अभिषेक झाला. सकाळी 8 वाजता सचिव अ‍ॅड. श्रीमाळी ह्यांनी ध्वजारोहण केले. उत्सवानिमित्त सकाळ, दुपार, संध्याकाळ ब्रह्मवृंदाद्वारे दररोज ‘दुर्गा सप्तशती पाठ’ करण्यात येत असून जेष्ठ गुरुजी राम गढीकर ह्यांच्या नेतृत्वात मिलिंद देवघरे, कुमार लेंघे गुरुजी आणि अनुज जोशी गुरुजी हे पाठ करीत आहेत. दररोज दुपारी आरती नंतर संस्थानतर्फे भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येत आहे.
 
Ambadevi Chaitra Navratri festival
 
उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. शनिवार 25 मार्च रोजी मंदिरात ‘सामुहिक रामरक्षा पाठ संध्याकाळी 5.30 वाजता होईल. Ambadevi Chaitra Navratri festival रविवार 26 मार्चला संध्याकाळी कान्यकुब्ज ब्राह्मण मंडळ ह्यांच्या भजनाचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता होईल. मंगळवार 28 मार्चला विनोद श्रीवास मित्रमंडळ ह्यांच्या वतीने सुंदरकांड पाठ दुपारी 4 वाजता होईल. बुधवार 29 मार्चला संस्थानच्या कोषाध्यक्षा मीना पाठक यांच्याहस्ते आचार्य गोवर्धन शास्त्री पुराणिक व ब्रह्मवृंद यांचे नेतृत्वात होमहवन होईल. रामजन्मोत्सव गुरुवारी 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजता संस्थानचे विश्वस्त श्री किशोर बेंद्रे ह्यांच्या हस्ते होईल. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उत्साहाने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संस्थानचे विश्वस्त मंडळाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0