‘शार्क टँक इंडिया’चा अनुपम मित्तल रुग्णालयात

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
मुंबई, 
शार्क टँकमधील (Shark Tank India)  प्रसिद्ध जज आणि ‘शादी डॉट कॉम’चा प्रणेता (Anupam Mittal) अनुपम मित्तल याने त्याचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. आपल्या हटके प्रतिक्रियांसाठी आणि परखड वक्तव्यासाठी ओळखल्या जाणार्‍या अनुपमला हात मोडल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. 51 वर्षांच्या अनुपमच्या त्या फोटोवर नेटकर्‍यांनी त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 
Anupam Mittal
अनुपम (Anupam Mittal) हा शार्क टँक इंडियामधून (Shark Tank India) लोकप्रिय झाला. शादी डॉट कॉममुळे सोशल मीडियावर नेहमीच प्रसिद्ध असणार्‍या अनुपमच्या व्हायरल व्हिडीओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. तो त्याच्या फिटनेससाठीदेखील चाहत्यांचा चर्चेचा विषय राहिला आहे. आता त्याच्या रुग्णालयात दाखल झालेल्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनुपमने इंस्टावर फोटो शेअर केला असून त्याला त्याच्या चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याने तो फोटो शेअर करताना लिहिले आहे की, मंजिल जब दूर हो जाए तो मेहनत से फाईट करो... त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटस्चा वर्षाव केला आहे.