‘भारत गौरव डिलक्स पर्यटक ट्रेन’ सुरू

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
केंद्र सरकारने देशातील विविध क्षेत्रांना Bharat Gaurav Train जोडण्यासाठी नवीन मार्गांसह अनेक नवीन गाड्यांची घोषणा केली. तसेच रेल्वे गाड्यांमधील नावीन्य व नूतनीकरणावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव डिलक्स पर्यटक ट्रेन’ सुरू केली. ही ट्रेन नवी दिल्लीहून सुरू झाली असून ती ईशान्य भारत सर्किट पूर्ण करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या आलिशान ट्रेनमधील एक व्हिडीओसुद्धा सामायिक केला आहे व या व्हिडीओला नेटकर्‍यांनी पसंती दर्शविली आहे.
 

gfy
 
रेल्वे मंत्रालयाच्या Bharat Gaurav Train अधिकृत माहितीनुसार, ही ट्रेन आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, त्रिपुरा व मेघालय या राज्यात जाईल. ही ट्रेन 15 दिवसांत ईशान्य भारताचा प्रवास करेल. ‘ईशान्य भारत सर्किटची थीम नॉर्थ ईस्ट डिस्कव्हरी : बियॉण्ड गुवाहाटी’ अशी थिम आहे. दिल्लीतील सफदरजंग रेल्वेस्थानकावरून सुरू झालेला हा रेल्वे प्रवास आसाममधील गुवाहाटी, शिवसागर, जोरहाट व काझीरंगा या भागातून मार्गक‘मण करेल. पुढे त्रिपुरातील उनाकोटी, आगरतळा व उदयपूर येथून ही ट्रेन जाईल. तर नागालॅण्डमधील दिमापूर व कोहिमामार्गे मेघालयातील शिलाँग व चेरापुंजी येथे जाणार आहे. परराष्ट्र व सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी हिरवी झेंडी दाखवून या ट्रेनची सुरुवात केली. भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2021 मध्ये ‘भारत गौरव योजना’ सुरू केली. दिल्ली, गाझियाबाद, अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर, लखनौ व वाराणसी येथून या ट्रेनमध्ये बोर्डिंग व डी-बोर्डिंगला परवानगी असेल. या डिलक्स एसी ट्रेनमध्ये एकूण 156 पर्यटक प्रवास करू शकतात.
 
ट्रेनमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार
15 दिवस धावणार्‍या Bharat Gaurav Train या ट्रेनचा गुवाहाटी हा पहिला थांबा असेल. येथे पर्यटक कामाख्या मंदिराला भेट देऊ शकतात. यानंतर उमानंद मंदिर व ब्रम्हपुत्रेवर सूर्यास्त क्रूझचा आनंद घेऊ शकतात. ही ट्रेेन अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून 30 किमी अंतरावर असलेल्या नाहर लागून रेल्वे स्थानकापर्यंत देखील जाईल. या प्रवासात पर्यटकांना अहोम राज्याची जुनी राजधानी शिवसागरसुद्धा पाहायला मिळेल. आधुनिक डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेनमध्ये दोन उत्तम रेस्टॉरेंटशिवाय मिनी लायब‘रीसार‘या अनेक सुविधा उपलब्ध असतील, असे रेल्वेच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
 
असे असेल भाडे
एसी 2-टायरमध्ये प्रति व्यक्ती 1,06,990 रुपये, एसी-1 केबिनमध्ये प्रति व्यक्ती 1,31,990 रुपये व एसी-1 कूपमध्ये 1,49,290 रुपये प्रति व्यक्तीपासून भाडे सुरू होते. तिकिटामध्ये रेल्वे प्रवास, हॉटेलमध्ये मुक्काम, सर्व शाकाहारी जेवण, संबंधित शहरांमध्ये प्रेक्षणीय स्थळे पाहणे व इतर खर्चाशिवाय प्रवास विमा शुल्काचा समावेश आहे.