एकनाथ शिंदे आणि समर्थक अयोध्या दौऱ्यावर!

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
मुंबई,
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  Eknath Shinde  सर्व समर्थक आमदारांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.ठाण्यातील शिरोमणी महाराज बिजली पासी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. कार्यक्रमात  बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही लोक उत्तर भारतातून आला आहात. तुम्ही नेहमी अयोध्येला जात असता. आता आम्हीही अयोध्येला जाणार आहोत. यापूर्वी आम्ही रामाचं दर्शन घेतलं होतं. आता पुन्हा तिथं जाऊन सर्व आमदारांसह प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहोत. याशिवाय अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आम्ही यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलेलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आगामी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. ६ ते २१ एप्रिल दरम्यान मुख्यत्र्यांसह सर समर्थक अयोध्याय दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या दौऱ्यादरम्यान शिंदे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये सहभागी होतील. 
 
gyt  
 
उत्तर भारत आणि Eknath Shinde महाराष्ट्रा वेगळा नाही. त्यामुळं मुंबईत लवकरच पासी भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यात पाच महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयामुळं संपूर्ण देश खुश असून आमचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी उसळत असल्याचं शिंदे म्हणाले. सर्व जातीपातींना सोबत घेऊन आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. त्यामुळं कुणी कुठेही असेल तर कोणताही त्रास होणार नाही, कारण आता मी मुख्यमंत्री आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.