अनिल परब यांना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
मुंबई, 
माजी कॅबिनेट मंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते (Anil Parab) अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात दाखल बेकायदेशीर सावकारीत त्यांच्यावर मंगळवारपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा निर्देश न्यायालयाने दिला आहे. ईडीने सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देत, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका परब (Anil Parab) यांनी दाखल केली होती. या याचिकेवर तातडीने न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दखल घेत मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
 
Anil Parab