तरनतारन, फिरोजपूरमध्ये इंटरनेट बंदी कायम

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |

taran
 
चंदीगड,
Internet ban पंजाबमधील तरनतारन आणि फिरोजपूर जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवांवर बंदी कायम राहणार आहे. पंजाब सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल यांच्या विरोधात पोलिसांच्या कारवाईनंतर शनिवारपासून अफवा पसरू नयेत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. Internet ban तीन दिवसांनंतर इतर ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र तरनतारन, फिरोजपूर, मोगा आणि संगरूर या चार जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता तो मोगा आणि संगरूरमधूनही हटवण्यात आला आहे.