सोनू निगमच्या वडिलांच्या घरातून लाखोंची चोरी

23 Mar 2023 14:40:33
मुंबई, 
बॉलिवूड गायक सोनू निगमचे (Sonu Nigam) वडील आगम कुमार यांच्या घरात चोरी झाली आहे. ही चोरी सुमारे 72 लाख रुपयांची आहे. आगम यांनी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भादंवि कलम 380, 454 आणि 474 नुसार गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, सोनू निगमच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना त्यांच्या माजी ड्रायव्हरवर संशय आहे.

Sonu Nigam
आगम कुमार आणि त्यांची मुलगी म्हणजेच सोनू निगमच्या (Sonu Nigam) बहिणीने सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज शोधले, तेव्हा ते माजी ड्रायव्हर बॅग घेऊन जाताना दिसले. 19 आणि 20 मार्च रोजी या चोरीच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले. खरं तर, 19 मार्च रोजी आगम कुमार त्यांच्या मुलीच्या घरी जेवणासाठी गेला होता. मात्र संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांना डिजिटल लॉकरच्या लाकडी कपाटातून 40 लाख रुपये गायब आढळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आगम यांनी पुन्हा आपल्या मुलीच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला आणि परत आल्यावर पुन्हा सुमारे ३२ लाख रुपयांची चोरी झाल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे घरातून सुमारे 72 लाख रुपये गायब झाले.
आगम कुमारचा माजी ड्रायव्हर रेहानला 8 महिन्यांपूर्वी कामावर घेण्यात आले होते, परंतु (Sonu Nigam) सोनू निगमचे वडील त्याच्यावर खूश नव्हते आणि म्हणून त्याला काढून टाकण्यात आले. पोलीस चोरीचा तपास करत आहेत. मात्र, चालकाच्या अटकेचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यावर लवकरच कारवाई होईल, अशी आशा आहे. अशाचप्रकारे रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या घरी नुकतीच अशीच काही चोरी झाली. या प्रकरणात दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरातील नोकराला पकडण्यात आले आणि त्याच्यासह चालकालाही अटक करण्यात आली. त्याने ऐश्वर्याच्या घरातून लाखोंचे दागिने गायब केल्याचे सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0