परिणीती करत आहे 'यांना' डेट!

23 Mar 2023 14:56:43
मुंबई,
Parineeti is dating राजकारण आणि बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून एक नवीन बातमी समोर आली आहे. खरं तर, बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि प्रसिद्ध आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, दोघेही काल संध्याकाळी मुंबईत एकत्र स्पॉट झाले होते. दोघेही एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसले. त्याचवेळी परिणीती आणि राघव एकमेकांना डेट करत आहेत की काय अशी अटकळ बांधली जात आहे.
 
 
chaddhas
 
चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' या सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. भारतात पहिल्यांदाच एखाद्याला हा सन्मान मिळाला आहे. नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियन (NISAU) यांनी ब्रिटीश कौन्सिल इन इंडिया आणि यूकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग (DIT) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान आयोजित केला होता. Parineeti is dating 15 वर्षांपूर्वी परिणीती चोप्रा ब्रिटनच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती अजूनही अविवाहित असताना आणि राघवने वयाच्या ३४ व्या वर्षापर्यंत लग्न केलेले नाही, पण चाहते त्यांना एकत्र पाहण्याचा अंदाज लावत आहेत.
Powered By Sangraha 9.0