चुरणी गावात पाण्याची भीषण टंचाई

नागरिकांची दाहीदिशा भटकंती

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चिखलदरा, 
तालुक्यातील चुरणी गावात Severe water shortage पाणीपुरवठा करणारी एक विहीर असून एकच विद्युत मोटार आहे. पूर्ण गावाला एकाच विहिरीवरून पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना मुलांसह मिळेल त्या ठिकाणावरून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
 
Severe water shortage
 
चुरणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे चुरणी गाव तहानेने व्याकुळ झाले असून घोटभर Severe water shortage पाण्यासाठी गावकर्‍यांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून 65 किमी अंतरावर वसलेल्या सुमारे 5 हजार कुटुंबांच्या लोकवस्तीचे हे गाव असून गावात मार्चच्या सुरवातीपासूनच पाणीटंचाईला सुरवात झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री महिला व पुरुष जंगलातून पाणी आणण्याचा आटापिटा करताना दिसत आहे. प्रशासनाने वेळेत पाणी पुरवले नाही तर कित्येक बळी जातील व याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल येथील युवकांनी व्यक्त केला. संबंधित प्रशासनाने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
 
 
प्रशासनाचा हलगर्जीपणा
याबाबत बोलताना भाजयुमोचे जिल्हा ग्रामीण सचिव सुमित चावरे म्हणाले की, चुरणी येथे दरवर्षी उन्हाळ्यात Severe water shortage पाणीटंचाई असते व हे सारे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा गावातील नागरिक आंदोलन करतील.
 
 
कुपनलिकेचे अधिग्रहण करणार
याबाबत ग्रामसेवक अमरदीप तुरकाने यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या Severe water shortage पाण्याची पातळी कमी झाली आहे, त्यामुळे गावाच्या विहिरीत पाणी जमा करून दोन ते तीन दिवसांनी आम्ही गावाला पाणीपुरवठा करतो. पंचायत समितीकडे कुपनलिका अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर झाल्यावर नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होईल.