तारांकित प्रश्नही ठरला निरुपयोगी

शेतकर्‍यांचे खाते गोठलेलेच
युनियन बँकेतील प्रकार

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी,
युनियन बँक ऑफ इंडियाकडून Union Bank कर्ज घेतलेल्या थकित कर्जदार शेतकर्‍यांचे युनियन बँकेने खाते गोठविल्याप्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतरही थकित कर्जदार शेतकर्‍यांचे खाते मात्र या बँकेने अजूनही गोठविलेच असल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक Union Bank युनियन बँक ऑफ इंडियाकडून शेतकर्‍यांनी शेतीवर कर्ज उचलले होते. सततची नापिकी, कोरोनाचा काळ, शेतमालाला भाव नाही अशा विविध कारणांनी थकबाकीदार झालेले शेतकरी मुदतीच्या आत कर्ज भरू शकले नाहीत, त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेत. परंतु बँकेने शेतकर्‍यांचा कोणताही विचार न करता शेतकर्‍यांचे बँकेतील आर्थिक व्यवहाराचे बचत खाते गोठविण्याचा प्रताप केला.
 
Union Bank
 
बँकेच्या या हुकुमशाही धोरणामुळे इतर आर्थिक व्यवहार करण्याकरिता Union Bank बँकेचा ग्राहक असलेला शेतकरी अडचणीत आला. शेतकर्‍याचे आर्थिक व्यवहार थांबून गेलेत. पीक विम्याचे पैसे, गॅस सिलेंडरची सबसिडी, इतर शासनाचे मिळणारे अनुदान खातेच बंद असल्यामुळे परत जाणार अशी भीती थकित कर्जदार शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे . या बाबीची गंभीर दखल दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी घेऊन विधानसभेत याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास दिले होते. मात्र, विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतरही युनियन बँकेने थकबाकीदार शेतकर्‍यांचे खाते मात्र गोठवलेलेच ठेवले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने सुद्धा शेतकर्‍यांचा हा सदर प्रश्न गंभीरपणे घेतल्या नसल्याचा आरोप शेतकर्‍यांमध्ये होत आहे.
 
 
आदेश वरूनच
याबाबत स्थानिक Union Bank युनियन बँकेचे व्यवस्थापक रितेश फुलमाळी यांना विचारले असता ते म्हणाले की, थकबाकीदार कर्जदार शेतकर्‍यांचे खाते वरिष्ठ कार्यालयाकडून गोठविण्यात आली असून थकबाकीदार शेतकर्‍यांनी आपले थकित कर्ज भरून बचत खाते चालू करावे.