ट्रॅव्हल्सची वनविभागाच्या गाडीला धडक

वनपरिक्षेत्र अधिकारी जखमी
सेमाडोहजवळील घटना

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चिखलदरा,
परतवाडा ते धारणी रस्त्यावर मेळघाटातील पिली येथे ट्रॅव्हल्स व forest department वनविभागाच्या गाडीची धडक होऊत त्यात वन परिक्षेत्र अधिकारी जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारच्या वेळी घडली. धारणीकडे येणारी श्रीराम ट्रॅव्हल्सची बस व परतवाडाकडून धारणीकडे जाणारी वनविभागाची गाडी यांची पिली गावानजीक जोरात धडक झाल्याने शासकीय वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. यात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश युनाते हे जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह व त्यानंतर परतवाडा येथे हलविण्यात आले.
 
forest department
 
श्रीराम ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ज्या forest department ठिकाणी अपघात झाला, तिथेच मोठा पूल असल्यामुळे कोणतेही वाहन पुलाखाली गेले असते, तर मोठी घटना घडली असती. मात्र थोडक्यात सर्व प्रवासी बचावले आहेत. दुसरीकडे शासकीय वाहनाचे 43 वर्षीय वाहन चालक परतवाडा, कांडली येथील रहिवासी मिठाराम मुन्सी कोल्हे यांनी चिखलदरा पोलिस स्टेशनला येऊन तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी श्रीराम बसच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.