स्वा. सावरकर, राहुल गांधी आणि गदारोळ

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
मुंबईत विधानसभेमध्ये गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर (freedom fighter Savarkar) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसने आणि (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरून गदारोळ झाला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत त्यांचा निषेध केला आणि या गदारोळात सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले.
 
Rahul Gandhi
 
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा विषय उपस्थित केला. त्यापाठोपाठ शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका केली आणि ते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना साथ देत असल्याबद्दल निषेध केला. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा (freedom fighter Savarkar) अपमान करणार्‍या मणिशंकर अय्यर यांना चपलेने मारायला हवे, असे जाहीर केले होते. त्याउलट त्यांचे वारस आज राहुल गांधींना साथ देत आहेत, अशी टीका केली. स्वा. सावरकर यांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला.
 
 
एकीकडे सत्ताधारी सदस्य सावरकर अवमानाविरुद्ध आक्रमक होत असतानाच विरोधी पक्षांचे सदस्यही सत्ताधार्‍यांविरुद्ध घोषणाबाजी करत होते. परिणामी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकही त्याला घोषणांनीच उत्तर देत होते. तेव्हा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासाकरिता तहकूब केले.
 
 
कामकाज पुन्हा सुरू होताच आमदार अतुल भातखळकर यांनी बोलण्यास सुरुवात केली. (freedom fighter Savarkar) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनला जाऊन ब्रिटिशांच्या छाताडावर पाय ठेवून क्रांतिकार्य केले आणि एक गुन्हेगार, शिवाय 5 हजार कोटी रुपयांच्या गुन्ह्यात जामिनावर असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांच्यावर टीका करतात. त्यांची लायकी आहे का? मी त्यांचा निषेध करतो, असे वक्तव्य केले.