अमेरिकेत हायस्कूलमध्ये गोळीबार

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
 SWEDG
 
वॉशिंग्टन,
shootings in America अमेरिकेतील डेन्व्हर ईस्ट हायस्कूलमध्ये बुधवारी गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. डेन्व्हर हायस्कूलमध्ये बुधवारी सकाळी दोन जणांवर गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त एपी न्यूज एजन्सीने दिले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याजवळ एक बंदूक दिसली आहे. यावेळी अल्पवयीन आरोपी अद्याप पकडला गेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.