सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आजही मनोहरभाऊ सक्रिय..!

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
- रवी देशपांडे
पुसद,
पुसदमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका cooperative societies जानेवारी 2023 पासून सुरू आहेत. सुरुवातीला शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग निवडणूक सर्व गट व सर्वपक्षीय संचालकांना सुवर्णसंधी देऊन अविरोध पार पडली. कारला रोड स्थित जिनिंगची जमीन विक्री करून कोट्यवधीची रक्कम संस्थेकडे जमा झाल्याने त्या संस्थेच्या निवडणुकीत सभासदांना रस होता. विजय चव्हाण यांनी सर्व सभासदांना खूष करून निवडणूक जिंकली व अध्यक्षही बनले. मात्र खरेदी विक्री संघाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सर्वांना सामावून निवडणूक अविरोध करणे गरजेचे असताना गटातटाच्या भिंती उभारून निवडणूक खर्चाचा भुर्दंड संस्थेला सहन करावाच लागला.
 
cooperative societies
 
खरेदी विक्री संस्थेत मनोहर नाईक सहकारी पॅनेलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले असले तरी बयास गटाचे अपक्ष उमेदवार अ‍ॅड. वीरेंद्र राजे यांना 361 मते मिळाली. त्यावरून नाईकांना या cooperative societies निवडणुकीत बराच विरोध होता हे दिसून आले. पूर्वी सहकारी संस्थेमध्ये बयास गटाला हमखास स्थान दिल्या जाई. परंतु आता मात्र नाईकांनी तिकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. खविसं कार्यालयात संचालकांना बसण्यासाठी धड खुर्च्या नाहीत पण संचालकाच्या खुर्चीचा मोह आवरता आवरत नाही, असो. नुकताच शेतकर्‍यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची संस्था कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक‘म जाहीर झाला आहे.
 
 
या निवडणुकीत प्रामु‘याने सहकारी संस्था, cooperative societies ग्रामपंचायत, व्यापारी मापरी हमाल हे मतदारसंघ आहेत. नामनिर्देशन दाखल करण्याचा 27 मार्च ते 3 एप्रिल, 5 एप्रिल रोजी छाननी, 6 ते 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी. 28 एप्रिल रोजी मतदान आणि तीन दिवसांत मतमोजणी असा कार्यक‘म जाहीर झाला आहे. जिनिंग प्रेसिंग व खविसंमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही अशा उत्सुकांची सं‘या मोठी आहे. पुसदचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांची प्रकृती ठीक नसली तरीही सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते पूर्वीप्रमाणेच सहभाग घेत आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
 
 
खविसंसह मागील सहकारी संस्थांच्या cooperative societies निवडणुकांमध्ये नाईकांचे प्रतिनिधी म्हणून जिनिंग संस्थेचे अध्यक्ष विजय चव्हाण यांनी यशस्वी संचालन केले होते. आता बाजार समिती निवडणुकीतसुद्धा तेच सूत्रसंचालन करतील असे दिसते. दरम्यान, नाईक गटाच्या समर्थकांची सं‘या सर्वाधिक असल्याने बहुमताचा कल त्यांच्याकडे राहील. तथापि विरोधक या आगामी निवडणुकीत कसे शक्तीप्रदर्शन करतात, हे उत्सुकतेचे आहे.