धानोरा येथे गांजा तस्करांच्या आवळल्या मुस्क्या

    दिनांक :24-Mar-2023
Total Views |
धानोरा, 
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या Ganja smuggler आधारे सापळा रचून येथिल नविन बसस्टॉपसमोरील पटांगणात अवैध गांजा तस्करी करणार्‍यांच्या गडचिरोली पोलिसांनी 23 मार्च रोजी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 2 लाख 15 हजार 850 रुपयांचा मुदेमाल जप्त केला. जय निशिथ बाला (22), मनिशंकर गलितमहान सरकार (32) दोघेही रा. आर. एस. नंबर 2 ता. जवलगैरा जि. रायपुर राज्य कर्नाटक अशी आरोपींची नावे आहेत.
 

dtfr 
 
 
जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ Ganja smuggler तस्करी व इतर अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी कठोर कारवाईचे निर्देश सर्व पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्राच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. येथिल परिसरात सदर दोन्ही ईसम बॅगमधे गांजा हा मादक पदार्थ बाळगुन नविन बसस्टॉपकडे पायी येत असल्याची गोपनिय माहिती धानोरा पोलिस स्टेशनला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर दोन्ही व्यक्तिकडे असलेल्या तिन्ही बॅगची पंचासमक्ष तपासणी केली असता त्या बॅगमध्ये फिकट हिरवट रंगाचा उग्र वास येणारा सुखा गांजा वनस्पतींचे एकूण आठ गट्टे आढळून आले. त्याचे वजन 19 किलो 0.15 ग्रॅम होते. असा एकूण 2 लाख 14 हजार 850 रुपये किमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम एनडीपिएस 1985 अन्वये धानोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.