या "महाराष्ट्र भूषणां"ना ओळखता का तुम्ही ?

    दिनांक :24-Mar-2023
Total Views |
मुंबई,  
गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित Maharashtra Bhushan करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात 2021 रोजीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मविभषण आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत 19 जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.. तर मग जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. 10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप होते. आता या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात आली असून पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये करण्यात आली आहे.
vgtf
 
 
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल.देशपांडे- साहित्यक्षेत्रातील भरीव योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. 
लता दीनानाथ मंगेशकर- आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दीदी आणि भारतीय चित्रपट संगीताला अतिशय वरच्या दर्जावर नेण्याचं काम लता मंगेशकर यांच्या असामान्य आवाजाने केले. महाराष्ट्र शासनाने कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन 1998 मध्ये लता दीनानाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दैऊन गौरव केला. 
डॉ.विजय पांडुरंग भटकर- डॉ. विजय पांडुरंग भटकर हे महाराष्ट्रातील Maharashtra Bhushan मुरंबा या गावचे. डॉ. विजय भटकर यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळविली. सन 1999 मध्ये विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी “महाराष्ट्र भूषण“ प्रदान करण्यात आला आहे.
सुनील मनोहर गावस्कर- सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जवळजवळ वीस वर्षे मिरवणारा फलंदाज. सन 2000 मध्ये सुनील गावस्कर यांना त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सचिन रमेश तेंडुलकर-  सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा सन 2001 चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. 
 
पं.भीमसेन गुरुराज जोशी- लहानपणापासूनच संगीताचा ओढा असलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्र शासनाने सन 2002 मध्ये संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला. 
डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग- आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अभय बंग आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. समाजप्रबोधन या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देण्यासाठी 2003 साली या दाम्पत्याला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
डॉ.मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटे- मुरलीधर देवीदास आमटे कुष्ठरोग्यांसाठी जीवन वेचण्याचा निर्णय घेऊन हा मुरलीधर लाखो कुष्ठरोग्यांना आपलासा वाटणारा ‘बाबा’ झाला. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे बाबा सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढले. कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत अंगीकारले. 2004 साली महाराष्ट्र शासनाने समाज प्रबोधनासाठी डॉ. मुरलीधर आमटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला.
डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर- भारतातील Maharashtra Bhushan मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे. 2005 मध्ये विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. माशेलकर यांना महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा सन्मान केला.
रतन टाटा-  टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना उदयोग क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2006 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.
रामराव कृष्णराव ऊर्फ रा.कृ.पाटील- भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते.  ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांचे वयाच्या 99व्या वर्षी, 31 मे, 2007 रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.
नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी- समाजप्रबोधनासाठी 2008 साली महाराष्ट्र शासनातर्फे श्री. धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मंगेश केशव पाडगावकर - मंगेश केशव पाडगांवकर यांना 2008 साली महाराष्ट्र Maharashtra Bhushan शासनाने साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबददल महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 
सुलोचना लाटकर- मराठी चित्रपटात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला.
डॉ.जयंत विष्णू नारळीकर- जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक अशी डॉ. जयंत नारळीकर यांना 2010 मध्ये विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.
डॉ.अनिल पुरुषोत्तम काकोडकर- बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणाऱ्या डॉ. अनिल काकोडकर यांना  2011 मध्ये डॉ. काकोडकर यांना विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला.
बाबासाहेब पुरंदरे- बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे Maharashtra Bhushan मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन केले आहे. 2015 मध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आशा भोसले- बॉलीवूडमध्ये आशाताईंना 'मेलडी क्वीन' म्हणून ओळखले जाते. आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली असून आतापर्यंत त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत.सन 2021 या वर्षीचा पुरस्कार श्रीमती आशा भोसले यांना जाहीर झाला असून 24 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी-आप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. सन 2022 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे.