डॉ. अनिल काळबांडे यांना राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार

    दिनांक :25-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
मिलिंद महाविद्यालय मुळावाचे मराठी विभागप्रमुख, जागतिक साहित्यिक तथा पत्रकार (Dr. Anil Kalbande) डॉ. अनिल काळबांडे यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूरच्या वतीने पत्रकार क्षेत्रातील सामाजिक लिखाणाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला.
 
(Dr. Anil Kalbande)
 
हा पुरस्कार 26 मार्च रोजी नागपूर येथील मधुरम सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक खोब्रागडे त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तर वासनिक (दिल्ली), महेश चौगुले (बेळगाव कर्नाटक), डॉ. जगन कराडे (कोल्हापूर), मधुकर वानखेडे (दिल्ली) या मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल देऊन प्रदान केल्या जाणार आहे. जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाचा 9 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन, सत्कार सोहळा व राष्ट्रीय कवी संमेलनाचेही आयोजन या वेळी करण्यात आले आहे.
 
 
डॉ. काळबांडे (Dr. Anil Kalbande) यांनी, मराठी भाषेचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जवळपास दहा देशाचा प्रवास केला आहे. या अगोदरसुद्धा त्यांना प्रा. राजा ढाले वैचारिक लेखन पुरस्कार, मलेशिया येथे नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, प्रबुद्ध भारत साहित्यरत्न पुरस्कार, महाकवी वामनदादा कर्डक उत्कृष्ट वांग्मय निर्मिती पुरस्कार, डॉ. बी. आर. आंबेडकर एक्सलन्स इंटरनॅशनल अवार्ड नवी दिल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
 
 
पत्रकारिता क्षेत्रातील (Dr. Anil Kalbande) पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचे अविनाश खंदारे, संतोष मुडे, दत्ता काळे, अशोक गांजेगावकर, राजा गांजेगावकर, विजय आडे, संतोष कलाने, दत्तात्रय देशमुख, राजू गायकवाड, निळकंठ धोबे, प्रशांत भागवत, अरविंद ओझलवार, अझरउल्ला खान, भीमराव नगारे, शाहरुख पठाण, साहेबराव धात्रक, अरुण बेलेसह अनेक पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.