क्षयरोगविरोधी लढ्यात भारत आघाडीवर राहण्यास सज्ज

25 Mar 2023 18:34:59
- मनसुख मंडाविया यांचे प्रतिपादन
 
नवी दिल्ली, 
क्षयविरोधी लढ्यात दक्षिण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री Mansukh Mandavia मनसुख मंडाविया यांनी शनिवारी केले. टीबीच्या विरोधातील लस ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी ती विकसित करण्यावर भर दिला. देशातील क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अटल वचनबद्धता आपण पाहिली आहे. क्षयरोगाच्या सहयोगी लढ्यात आम्ही आघाडीचे नेतृत्व करण्यास आणि दक्षिणेतील जगाचा आवाज बनण्यास आम्ही तयार आहोत, असे मंडाविया यांनी उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे एका कार्यक‘मात सांगितले.
 
 
Mansukh Mandavia
 
भारताने जी-20 अध्यक्षपदाच्या कालावधीत आरोग्य क्षेत्रातील तीन महत्त्वाचे प्राधान्यक्रम ओळखले आहेत. हे सर्व आरोग्य कव्हरेजवर केंद्रित आहेत आणिन क्षयरोग निर्मूलनासाठी आमच्या प्रतिसादाशी संबंथित असल्याचे मंडाविया म्हणाले. क्षयरोगी शोधणे, गणितीय मॉडेल तयार करणे, डिजिटल हस्तक्षेप आणि नजर ठेवण्यासारखी कित्येत अपवादात्मक कामे प्रत्यक्षात केली जात आहेत. अशा चांगल्या बाबींचा वापर करण्यासाठी इतर देशांसोबत तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात भारताला आनंद होईल, असे मंडाविया यांनी सांगितले. कोरोनातून केवळ सावरण्यासाठीच नव्हे तर, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानसारखी नाविन्यपूर्ण रणनीनीही आणण्याचे काम सुरू आहे, जी जगातील एक प्रकारची चळवळ बनली आहे, असे Mansukh Mandavia मंडाविया यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0