पतंजली योग समितीतर्फे हरिश देशमुख यांचा सत्कार

27 Mar 2023 14:03:33
नागपूर,
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात सातत्याने Harish Deshmukh कार्यरत असणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख यांचा पतंजली योग समिती, रघुजी नगरतर्फे सपत्नीक नुकताच सत्कार करण्यात आला. पतंजली योगपिठाचे ज्येष्ठ योग शिक्षक नामदेव फटिंग आणि प्रभाकर सावळकर यांचे हस्ते पं. दीनदयाल उपाध्याय गार्डन येथे शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे आणि स्मृतीचिन्ह देऊन हरिश देशमुख आणि मंदाकिनी देशमुख यांचा गौरव करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, समिती देव आणि धर्माच्या विरुद्ध नाही तर त्यांच्या नावावर होणाऱ्या लुबाडणुकीच्या विरुद्ध आहे.
 
 
gtt
 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन Harish Deshmukh गुलाब उमाठे यांनी आणि आभार महादेव बोराडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीराम दूरगकर, अरविंद गुंटेवार, माया सोनवाणी आणि हर्ष आगरकर यांनी परिश्रम केले.
याप्रसंगी भीमराव पाटील, मालती मामीडवार, दादाराव दातारकर, देवचंद दंडारे, मोरेश्वर मेघरे, गौतम सोमकुवर, कल्पना गाडगे, लता आंबेकर, ह भ प वाल्मीक आंबेकर, सुरेश धामणकर, साधना धाबेकर, विद्या सातपैसे, सुवर्णा पाकलवार, वेणू घोडखांदे, विणा विंचूरकर, इंदू बाविस्कर उपस्थित होते.
 
सौजन्य : श्रीराम दुरगकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0