नागपूर,
Vigyan Bharati विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाच्या पुढाकाराने गोविंद कॉन्व्हेंट कारंजामध्ये 25 मार्चला बिरबल साहनी पुरा विज्ञान संस्थान लखनौ येथील ४ शास्त्रज्ञांनी 'जीवाश्म विज्ञान' या विषयावर विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोविंद कॉन्हेंटच्या मुख्यापिका किरण व्यास तर प्रमुख म्हणून बिरबल साहनी पुरा विज्ञान संस्थेचे मार्गदर्शक शास्त्रज्ञ डॉ. अमलव भट्टाचार्य, डॉ. मयंक शेखर, डॉ. परमिंदर सिंग रनहोत्रा व डॉ. अखिलेश कुमार यादव तसेच प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान भारती नागपूरच्या मनीषा घारे, गिरीश जोशी, प्रा. रवींद्र मुकवाने, गोविंद कॉन्व्हेंटचे संचालक संतोष चौधरी, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरबल साहनी पुरा विज्ञान संस्थान लखनौ या संस्थेवर आधारित स्लाइड शो दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक संतोष चौधरी यांनी केले. मनीषा घारे यांनी मनोगतात विज्ञान भारतीच्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. गिरीश जोशी यांनी 'विद्यार्थी विज्ञान मंथन' या राष्ट्रीय परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. उपसिथत चारही शास्त्रज्ञांनी जीवाश्म विज्ञान म्हणजे काय? याचा अभ्यास कसा केला जातो? लाईन ऑफ गोथ म्हणजे काय? झाडाला इजा न करना त्याच्या खोडाचा सेक्शन कशा पद्धतीने Vigyan Bharati घेतला जातो? खोडावरील वलयांकित रेषा कशा असतात ? त्या सर्व सारख्याच आकाराच्या असतात का? त्या रेषा काय दर्शवतात? त्या रेषांवरून त्यावेळी वातावरण कसे होते? याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांसी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित शास्त्रज्ञांचे ऑटोग्राफ्स घेतले व त्यांच्यासोबत छायाचित्रे ही काढली. सदर कार्यक्रमात विद्यार्थी विज्ञान मंथन 2022 परीक्षेत वाशीम जिल्ह्यातील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञाच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे संचालन विभा लाहोरी तर आभार विजय भड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद कॉन्व्हेंटच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न घेतले.
सौजन्य: नरेश चाफेकर, संपर्क मित्र