कुरूम रेल्वे स्थानक परिसरात आग

    दिनांक :29-Mar-2023
Total Views |
कुरूम,
Kurum railway station येथून जवळच असलेल्या कुरूम रेल्वे स्थानक परिसरातील शेतातअचानक आग लागल्याने दोन शेतकर्‍यांच्या शेतात उभे असलेले गव्हाचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावले. मधापुरी येथील शेतकरी संतोष गांजरे यांचे कुरूम रेल्वे स्थानक वस्तीनजीक शेत असून, त्यामध्ये त्यांनी यावर्षी 3 एकर शेतात गव्हाच्या पिकाची पेरणी केली होती. त्याच शेताला लागूनच कुरूम रेल्वे स्थानक वस्तीतील रहिवासी प्रवीण गुजर यांचे 4 एकरातील गव्हाचे पीक कापून त्याचा ढीगारा लावण्यात आला होता तर रेल्वे स्टेशन वस्ती जवळच मच्छिंदर गायकवाड यांचे 3 एकरातील शेतात गव्हाचे पीक उभे होते.संतोष गांजरे यांनी काही दिवसांपूर्वी गव्हाचे पीक कापून ते घरी नेले होते.
 
 
pita
 
गांजरे यांच्या शेतात अचानक आग लागली व वार्‍यामुळे आगीने भीषण रूप धारण करत ती आग प्रवीण गुजर व मच्छिंदर गायकवाड यांच्या शेजारील शेतात पोहोचली. मात्र, रेल्वे स्थानक वस्तीच्या रहिवाशांच्या सतर्कतेमुळे दोन्ही शेतकर्‍यांचे गव्हाचे पीक थोडक्यात बचावल्याने कुरूम रेल्वे स्थानक वस्तीत मोठा अनर्थ टळला. Kurum railway station जर ही आग रेल्वे स्टेशन वस्तीपर्यंत पोहोचली असती तर अनेक गरीब लोकांची घरे जळून खाक झाली असती. यावेळी वस्तीतील महिलांनीही परिश्रम घेऊन आपआपल्या घरून पाणी आणून आग विझविण्यास मोठी मदत केली. शेजारीच शेतकरी शफी खान यांच्या शेतात विहीर व बोअरवेल असल्याने पाईप टाकून इलेक्ट्रिक मोटारपंपाद्वारे पाण्याने आग आटोक्यात आणली.