तभा वृत्तसेवा
अमरावती,
अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) म्हणून डॉ. निधी पांडे यांची नियुक्ती राज्य शासनाने शुक्रवारी केली. विद्यमानस्थितीत त्या गुंतवणूक व राजशिष्टाचार सचिव व आयुक्त म्हूणन दिल्ली येथे काम पाहत आहे. डॉ. दिलीप पांढरपट्टे विभागीय आयुक्त पदावरून 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले. ते पासून आयुक्त पद रिक्त होते. राज्य शासनाने सदर पदावर डॉ. निधी पांडे यांची नियुक्ती केली आहे. सध्या त्यांच्याकडे असलेल्या पदाचा पदभार अन्य अधिकार्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.