बुलढाणा,
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या Narayan Jadhav साहित्यविश्वातील एक मोठे नाव असलेले साहित्यिक, नाटककार, कवी, गायक नारायण जाधव येळगावकर यांना राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणार्या मानाच्या राम गणेश गडकरी साहित्य पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यशोधरा या दोन अंकी नाटकाच्या Narayan Jadhav पुस्तकासाठी हा राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनाच्या औचित्यावर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहुल नार्वेकर होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांत पाटील व मराठी भाषा व संस्कृती विभागाचे मंत्री ना. दीपक केसकर यांच्या हस्ते नारायण जाधव येळगावकर यांना सपत्नीक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायण जाधव यांना राज्य शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे साहित्य क्षेत्रासह सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. यानिमित्त येळगावचे नाव पुन्हा राज्याच्या नकाशावर चमकले आहे.