बुलढाणा,
जिल्ह्यातील विविध एमआयडीसीच्या विकास व विस्तारासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी Malkapur-Buldhana-Chikhli Road मलकापूर - बुलढाणा - चिखली हा या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्णत्वास न्यावे, तसेच जिल्हयातील प्रमुख मार्गांना व राज्यमार्गांच्या बळकटी करणासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत जिल्हयाला वाढीव निधी देण्याची मागणी जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. सदर मागणी संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पाठपुरावा देखील केला आहे.
जिल्ह्यातील मलकापूर हा तालुका छक53 या महामार्गावर जोडलेला आहे. सदर मार्ग हा मलकापूर पासून प्रारंभ होऊन Malkapur-Buldhana-Chikhli Road मोताळा - बुलढाणा - चिखली - देऊळगाव राजा - जालना यांना हा महामार्ग जोडतो. पुढे हा महामार्ग औरंगाबाद येथे समाप्त होतो. मलकापूर - चिखली हा मार्ग एकीकडे नांदेड - हैदराबाद या मोठ्या शहराला जोडणारा असून दुसरीकडे हाच मार्ग इंदोरला देखील जोडलेला आहे. इंदोर ते हैदराबाद या मार्गावर मोठया प्रमाणात कृषी विकासाशी संबंधित सर्व प्रकारच्या वाहतुकी होतात. हा मार्ग हैदराबाद - इंदोर व बुलढाणा असा तीन राज्यांतील शहरांना जोडणारा आहे.
या रस्त्यावर असलेल्या पैनगंगा नदी वरील पुलाला दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येत असल्याने अनेक वेळा ट्रॅफिक जाम होते. चिखली ते जालना हा मार्ग शासनाच्या वतीने आधीच फोर लेन बनवलेला आहे. हा मार्ग पुढे Malkapur-Buldhana-Chikhli Road सोलापूर, बीड, नांदेड असा राष्ट्रीय मार्ग म्हणून ओळखला जातो. मलकापूर - बुलढाणा - चिखली हा मार्ग राज्य शासनाच्या वतीने बीओटी तत्त्वावर तयार करण्यात आलेला आहे. सदर महामार्गचा करार हा 2032 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या विकासासाठी या विषयाची मुख्य अडचण निर्माण होत आहे. जोपर्यंत बीओटी तत्त्वावरील हा करार संपत नाही तोपर्यंत केंद्र सरकारला हा रस्ता हस्तांतरित करता येणार नाही. अशी या रस्त्याची अडचण आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या विकासाचे काम रखडलेले आहे. यासोबतच या परिसरातील औद्योगिक वसाहती यांचा विस्तार व विकास पूर्णपणे रखडलेला आहे. परिणामी येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अनेक प्रकारच्या अडचणी येत आहे तर दुसरीकडे राज्य शासनाला या माध्यमातून महसूल देखील कमी प्रमाणात मिळत आहे. सदर विषयाचे गांभीर्य पाहता राज्य सरकार ची चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा व फोर लेन मार्ग चे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावे. अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.