दिल्लीत शिवरायांचे स्मारक उभारा!

    दिनांक :30-Mar-2023
Total Views |
- उदयनराजे भोसले यांची अमित शाह यांच्याकडे मागणी
 
नवी दिल्ली, 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगासमोर यावे यासाठी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्ली येथील भेटीप्रसंगी केली. खासदार Udayanraje Bhosale उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
 
 
Udayanraje Bhosle-Amit Shah
 
Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा, अशीही मागणी केली. त्याबाबत कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू, असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन शाह यांनी यावेळी दिले.