अन् आ. रणजित कांबळे राहुल गांधी सारखेच भडकले

    दिनांक :31-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Ranjit Kamble : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी सरकार अन्याय करीत असुन लोकशाही धोक्यात आली आहे. त्या विरोधात काँग्रेसच्या वतीने महा सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी आज 31 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात महापुरुषांची विटंबना होत असल्याकडे विषयी प्रश्‍न विचारला असता राहुल गांधी प्रमाणे आ. रणजित कांबळे पत्रकारांवर भडकत तुम्ही तुमचे कार्यालय बघा, असा सल्लाही दिला.
 
Ranjit Kamble
 
राहुल गांधीवर होत असलेला अन्याय आणि त्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आगामी महिनाभर विविध आंदोलनाची माहिती देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री सुनील देशमुख, राज्य प्रवक्ता मिलिंद चिमोटे, जिल्हा प्रभारी झिया पटेल, सहप्रभारी अमर वर्‍हाडे यांची काँग्रेसच्या सद्भावना भगन येथे पत्रकारांना माहिती दिली. यावेळी माजी मंत्री सुनील देशमुख म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत लोकशाही मार्गाने अदाणीसोबत भाजपा सरकारचे काय संबंध आहेत असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर राहुल गांधी यांना बोलण्यास मनाई करण्यात आली. गांधी यांनी अदाणी घोटाळा उपस्थित केल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याच आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
 
तर चिमोटे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाला प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर देणे बंधनकारक आहे. राहुल गांधी यांनी पक्षाच्या वतीने देशाच्या हिताचा प्रश्‍न विचारला होता. परंतु, देशाच्या इतिहासात प्रथमच संसदेत भाषण काढून टाकण्याची प्रक्रीया झाली. राहुल गांधी यांच्यावर हक्क भंग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सत्ताधार्‍यांनी वारंवार सभागृह बंद पाडल्याचा आरोप चिमोटे यांनी यावेळी केला. गांधींवर वैयक्तिक आरोप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकात 2019 मध्ये झालेल्या भाषणाचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
 
 
हे भाजपाचे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. या विरोधात आम्ही महिनाभर आंदोलनं करणार आहोत, असे ते म्हणाले. यावर पत्रकारांनी यापूर्वी झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे नेते आढळून आले नाहीत. 25-30 कार्यकर्तेच आंदोलनात असतात. मग, हे महासत्याग्रह आंदोलन कोणाच्या भरोश्यावर विचारले असता सुनील देशमुख म्हणाले की याची दखल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घेणार असुन योग्य वेळी कारवाई केल्या जाईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, आ. रणजित कांबळे, राजेंद्र शर्मा, प्रवीण हिवरे, डॉ. शिरीष गोडे, प्रमोद हिवाळे, मुन्ना झाडे, आदींची उपस्थिती होती. मात्र, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव व विधानसभेचे नेते शेखर शेंडे पत्रकरांमध्ये बसुन होेते.