स्पुटनिक लस बनवणार्‍या संशोधकाची हत्या

04 Mar 2023 21:30:54
मॉस्को,
स्पुटनिक व्ही (Sputnik Vaccine) या कोरोनाविरोधी लसनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संशोधक आंद्रे बोटिकोव्ह यांची त्यांच्या निवासस्थानी पट्ट्याने गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केल्याचे वृत्त रशियन माध्यमांनी शनिवारी दिले.
 
Sputnik Vaccine
 
बोटिकोव्ह 47 वर्षांचे होते. ते गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकॉलॉजी अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स (Sputnik Vaccine) येथे वरिष्ठ संशोधक होते. गुरुवारी ते अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले, असे वृत्त रशियन वृत्तसंस्था तासन तपास समितीच्या हवाल्याने दिले. कोरोनाविरोधी लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बोटिकोव्ह यांचा 2021 मध्ये गौरव केला होता. स्पुटनिक व्ही लस तयार करणार्‍या 18 संशोधकांपैकी बोटिकोव्ह एक होते, असे या वृत्तात म्हटले आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी हत्या म्हणून केली जात आहे, असे रशियातील तपास प्राधिकरण असलेल्या समितीने निवेदनात म्हटले आहे.
 
 
बोटिकोव्ह (Sputnik Vaccine) यांच्यासोबत वाद झाल्यानंतर एका तरुणाने पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. त्यांची हत्या भांडणातून झाली असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. बोटिकोव्ह यांचा मृतदेह सापडल्यानंतर लगेच संशयिताला अटक करण्यात आली. अटक केलेल्या तरुणाची गुन्हेगारी पृष्ठभूमी आहे.
Powered By Sangraha 9.0