7 कोटी 80 लाख रुपये नपंच्या खात्यात जमा : आ. डॉ. वजाहत मिर्झा

    दिनांक :05-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव,
प्रधानमंत्री घरकुलासाठी 7 कोटी 80 लाख रुपये नगरपंचायतच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे आमदार (Dr. Wajahat Mirza) डॉ. वजाहत मिर्झा यांनी सांगितले. केंद्र सरकारने व राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना नगरपंचायत हद्दीत राबवली आहे. सर्व नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याचा मानस राज्य व केंद्र सरकारने घेतलेला होता त्या अनुषंगाने महागाव नगरपंचायतमध्ये बांधकामाला प्रारंभ झाला होता. परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे या कामाला संतगती निर्माण झाली होती अनेकांचे निधी अभावी बांधकामे अपूर्ण राहिली व काही लाभार्थ्यांनी व्याजाने बाहेरून पैसे काढून आपले घरी पूर्ण केले.
 
Dr. Wajahat Mirza
 
मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आली. (Dr. Wajahat Mirza) महागाव नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे गट नेते शैलेश कोपरकर यांनी विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडे व्यथा मांडली. त्या अनुषंगाने थेट मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली व महागाव शहराची परिस्थिती पाहता प्रधानमंत्री आवास योजनेची निधीसाठी मागणी करण्यात आली.
 
 
त्या अनुषंगाने तत्काळ निधी देण्याचे संबंधित यंत्रणेला मुख्यमंत्र्यांनी सांगितले व केंद्र शासनाकडेही विनंती केल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार (Dr. Wajahat Mirza) डॉ. वजाहत मिर्झा यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळालेला असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महागाव नपंच्या आतापर्यंतच्या कालखंडात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रथम डीपीआरमध्ये 275 दुसर्‍या डीपीआर मध्ये 401 व तिसर्‍यामध्ये 179 लाभार्थ्यांची घरे मंजूर झालेली आहेत. ही सर्व घरे मागील नगरपंचायतच्या काँग्रेसच्या काळात मंजूर झाली होती. शैलेश कोपरकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे महागाव नगरपंचायत मध्ये 7 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाल्याचे सुद्धा मिर्झा यांनी सांगितले.
 
 
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विधान परिषदेचे आमदार (Dr. Wajahat Mirza) डॉ. वजाहत मिर्झा, महागाव नगरपंचायतचे शैलेश कोपरकर, महागाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष तथा नगरसेवक संभाजी नरवाडे, गजानन पाटील उपस्थित होते. या कामाकरिता महागाव नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी किरण सुकलवाड, नगरपंचायतचे अभियंता अक्षय राऊत, प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता आकाश चव्हाण, प्रधानमंत्री आवास योजनेचे सोनकांबळे, लिपिक अमोल गाडबैले यांनी पाठपुरावा केला आहे