भूवनेश्वर,
Firecracker Factory : बेकायदेशीरपणे चालवल्या जात असलेल्या ओडिशातील खुर्दा येथील फटाके निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात चार जण ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरपासून 40 किमी अंतरावर असलेल्या टांगी भागातील भुसंदपूर गावात ही घटना घडली आहे.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, होळीच्या सणासाठी येथे एका घरात (Firecracker Factory) फटाके बनवले जात होते. या दुर्घटनेत घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला खूप संघर्ष करावा लागला. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत आतापर्यंत फक्त एका मृतदेहाची ओळख पटली आहे. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.