पाठीच्या कण्याच्या विकारांवर निःशुल्क योगोपचार शिबीर

janardan swami ७२ वर्षांपासून योग प्रचार प्रसार कार्य

    दिनांक :06-Mar-2023
Total Views |
नागपूर,
 
janardan swami योगाभ्यासी मंडळ ही संस्था गेल्या ७२ वर्षांपासून योग प्रचार प्रसार कार्य करीत आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वेगवेगळ्या आजारांवर योगोपचार करणे आणि व्याधी दूर करणे. janardan swami  आजच्या युगात पाठीच्या कण्याचे विकार फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. मानेमध्ये दुःख, कमरेमध्ये दुःख, हातामध्ये दुःख, हाताला मुंग्या येणे, हातात दुर्बलता येणे, कमरेमध्ये दुःख, पायाला मुंग्या येणे, पायाची ताकद कमी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. janardan swami या सर्वांवर योगाचा फार चांगला उपयोग होतो आणि ही सर्व लक्षणे पूर्णतः बरी होतात. janardan swami  असा गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जाणिवेतून या विकारांवर उपचार करण्यासाठी एक मोठे शिबिर घेण्याची योजना योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर येथे करण्यात आली आहे. janardan swami  हे शिबिर 15 मार्चला सकाळी 7 ते 8 या वेळात प्रारंभ होईल.
 
 
yog
 
janardan swami  सर्व शिबिरार्थींनी सतरंजीवर अंथरायला एक पातळ चादर आणावी. पुरुषांसाठी:- हाफ पॅन्ट, बर्मुडा, ट्रॅक सूट लोवर, टीशर्ट किंवा ढगळा पैजामा, बंडी असा वेश असावा. janardan swami  महिलांसाठी:- पंजाबी ड्रेस किंवा ट्रॅक सूट हा वेश अपेक्षित राहील. सर्वांनी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असल्याने लवकरात लवकर आपली नोंदणी करावी. शिबिर निःशुल्क असून, प्रथम येणा-यास प्राधान्य राहील. येताना आपले मेडिकल रिपोर्ट्स जरूर आणावे. janardan swami  हे नि:शुल्क शिबिर जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूर येथे 15 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत दररोज सकाळी 7 ते 8 या वेळात होईल, याची नोंद घ्यावी. janardan swami  अधिक माहितीसाठी संपर्क :- जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर. सकाळी ७ ते ९:३० आणि सायंकाळी ६ ते ८, असे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूरचे कार्यवाह मिलिंद वझलवार यांनी कळविले आहे.
सौजन्य : हरिभाऊ देशपांडे, संपर्क मित्र