जगातील एकमेव दुमजली रेल्वेगाडीचा बोगदा भारतात

-अरावली पर्वतीय क्षेत्रात निर्मिती

    दिनांक :08-Mar-2023
Total Views |
गुरुग्राम, 
डबल डेकर अर्थात दुमजली रेल्वेगाडी (Double-decker train tunnel) धावू शकणार्‍या बोगद्यामध्ये रूळ टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. देशाच्या उत्तर भागातील अरावली पर्वतीय क्षेत्रात ही निर्मिती होत असून, हा प्रकल्प जगातील पहिलाच असल्याचे रेल्वे सूत्राने सांगितले. वेस्टर्न डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडोरअंतर्गत (डब्ल्यूडीएफसी) अरावली पर्वतीय क्षेत्रात 1 हजार 504 किलोमीटर अंतराचे रेल्वेजाळे तयार करण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनलपासून (महाराष्ट्र) दादरी (उत्तर प्रदेश) हा मोठा प्रकल्प असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यात हरयाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. एकूण 1 हजार 504 किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गावर सरासरी 100 किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या धावतील. यातून रस्त्यांवरील माल वाहतुकीच्या वाहनांवरील ताण कमी करता येणार आहे.
 
Double-decker train tunnel
 
एक किलोमीटर लांबीच्या या (Double-decker train tunnel) बोगद्यामध्ये रूळ टाकण्याचे काम सुरू झाले असून, ते 20 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. चालू महिन्याअखेर तावडू ते पृथला हा भाग पूर्णत्वास येणार आहे. या मार्गावर एप्रिलपासून दादरी ते रेवाडीपर्यंत मालगाड्या चालविण्यात येईल. दादरी ते पृथला आणि तावडू ते रेवाडीपर्यंतचा भाग पूर्णपणे तयार आहे.
 
मालगाड्यांसाठी...
मालगाड्यांसाठी स्वतंत्र कॉरिडोर निर्मितीच्या उद्दिष्टाने (Double-decker train tunnel) भारतीय रेल्वेने डब्ल्यूडीएफसी विकसित करण्याचा निर्णय घेतला. सदर कॉरिडोर चांगल्या पद्धतीने आणि तातडीने तयार व्हावा, यासाठी अनेक भागांमध्ये काम करण्यात येत आहे. यातील एक भाग उत्तर प्रदेशातील दादरीपासून हरयाणामधील रेवाडीपर्यंत आहे. याच मार्गावर अरावली पर्वतीय भागात सोहनाजवळ बोगदा बनविण्यात आला आहे. रूळ टाकण्याचे काम संपताच डिझेल आणि नंतर विद्युत इंजीनकडून चाचणी घेण्यात येईल.
 
असा असेल बोगदा
-दुमजली रेल्वेगाड्यांच नव्हे तर एकावेळी दोन गाड्या धावतील
 
-(Double-decker train tunnel) बोगद्याची रुंदी 15 मीटर, उंची 12 मीटर
 
-जगातील एकमेव बोगदा भारतात