अन् जिल्हा परिषद सभापती टेंभरे पोहोचले मोक्यावर!

10 Apr 2023 19:52:28
तभा वृत्तसेवा
गोंदिया,
जवळील फुलचूर येथील नागरिकांच्या त्यांच्या भागातील समस्या सांगण्याकरिता भेट घेण्यासाठी वेळ मागीतली असता, क्षेत्राचे प्रतिनिधी करणार्‍या Zilla Parishad जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे यांनी थेट समस्याग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
 
Zilla Parishad
 
गोंदिया शहराला लागू असलेल्या फुलचूर जिल्हा परिषद क्षेत्रात फुलचूर व फुलचूरटोला या दोन मोठ्या ग्रामपंचायती असून निमशहरी भागात मोडतात. नोकरदार व व्यापारी वर्ग या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. असे असतानाही या भागात रस्ते, नाली व सांडपाण्याची समस्या आहेत. या Zilla Parishad क्षेत्राचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंभरे करीत आहेत. फुलचूर येथील सेव्हन हिल्स कॉलनीत मागील आठ ते दहा वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र अजूनही या ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्ता, नाली व सांडपाण्याची कोणतीच व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही. वारंवार याबाबत पाठपुरावा केला.
 
 
मात्र कोणतीच सुविधा मिळाली नाही. दरम्यान, येथील नागरिकांनी Zilla Parishad जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्यासमोर भागातील समस्या मांडण्यासाठी भ्रमणध्वनीवरून वेळ मागितली. मात्र संजय टेंभरे यांनी मीच मोक्यावर येतो व शक्य होईल ती मदत करण्याचे आश्वासन देत अवघ्या काही तासातच सेव्हन हिल्स कॉलनी येथे भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व येत्या दोन महिन्यात रस्ता बांधकामाचे आश्वासन दिले. यावेळी सेवानिवृत्त माजी सैनिक बाबुलाल मेश्राम, पोलिस कर्मचारी आशिष पडोळे, खोमेश पटले, भागचंद्र रहांगडाले, सुनील रहांगडाले, रोहित रामटेके, माजी सैनिक शेखर खोब्रागडे, माजी सैनिक उईके आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0