महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

11 Apr 2023 18:40:37
वाशीम, 
Mahatma Phule Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती), नागपूर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. आणि जिल्हा जात पडताळणी समिती यांच्या संयुक्त वतीने शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
Mahatma Phule Jayanti
 
यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला हिरवी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच इतर मान्यवर या (Mahatma Phule Jayanti) रॅलीत सहभागी होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरु करण्यात आली. रॅली नंदीपेठ येथे पोहोचून समाज कल्याणचे सहायक आयुक्त वाठ यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर न्याय भवन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनपटावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करुन महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
 
 
अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त आंबेडकरी विचारवंत गोपाळराव आटोटे गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रभान पौळकर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. दिपक उलेमाले, प्रा. रवि बावीसकर, अ‍ॅड. डी. के. सांबार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, पोलिस निरीक्षक राठोड व समाज कल्याणचे सहाय्य्क आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त आटोटे गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणास्त्रोत महात्मा फुले होते. नवसमाज निर्मितीमध्ये महात्मा फुले यांचे योगदान खूप मोठे आहे. अज्ञानाचे मूळ कारण अविद्या आहे. म्हणून शिक्षण हे सार्वत्रिक झाले पाहिजे यावर (Mahatma Phule Jayanti) महात्मा फुले यांनी भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Mahatma Phule Jayanti कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन हिवसे यांनी केले. आभार हरीष वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी, नागरीक, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी, शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व सर्व ब्रिस प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0