तभा वृत्तसेवा
गोंदिया,
Baby Snakes : शहरातील शास्त्री वॉर्डात एका घराच्या दरवाजाच्या लाकडी चौकशीखाली सापाची तब्बल 39 पिल्लं आढळली. हा प्रकार 7 एप्रिल रोजी उघडकीस आला. दरम्यान सर्पमित्रांनी सापाच्या पिल्लांना पकडून जवळील पांगडी जंगलात सोडले. मात्र या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शास्त्री वॉर्डातील राजेश सीताराम शर्मा यांचे 20 वर्ष जुने बांधकाम असलेले घर आहे. घरातील एक लाकडी दरवाजाच्या चौकटीतून साप बाहेर पडत असल्याचे घरातील कामवाली बाईला दिले. दरम्यान, त्यांनी त्या सापाला पकडून दूर सोडून दिले. मात्र, काही वेळाने त्याच दरवाजाच्या चौकटीतून तीन-चार साप डोके बाहेर काढताना आढळले. त्यांनी लगेच सर्पमित्र बंटी मिश्रा व त्यांचे सहकारी आकाश शर्मा यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ते शर्मा यांच्या घरी पोहोचले व 4 तासाच्या रेस्क्यूनंतर दरवाजाच्या चौकटीखालील फरशी खालून सापाचे तब्बल 39 पिल्लू काढले. हे सापाचे पिल्लं 5 ते 7 इंच लांबीचे व तास्या प्रजातीचे (आल्यू किल बेक) असून या प्रजातीचे सापाने टाकलेल्या अंडीतून पिल्ल बाहेर पडण्यास सुरुवात होताच साप अंडी टाकलेले सोडत असल्याची माहिती बंटी मिश्रा यांनी दिली. दरम्यान सर्पमित्रांनी सापाच्या पिल्ल्यांना डब्ब्यात बंद करुन जवळील पांगडी जंगलात सोडले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.