तभा वृत्तसेवा
पुसद,
Monthly Salary : पुसद नगर परिषदच्या मराठी कन्या शाळा क‘मांक दोनमध्ये कार्यरत शिक्षकाने मुलांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी शासनाची दिशाभूल करण्याचा प्रताप केला आहे. सहायक शिक्षक पदावर काम करणार्या या इसमाचा दरमहा पगार जवळपास 86 हजार रुपये असून वर्षाकाठी दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न आहे. एवढे उत्पन्न असूनदेखील त्याने पुसद तहसील कार्यालयात खोटी माहिती सादर करून 30 हजार रुपये वार्षिक उत्पन्न दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासाठी गेल्या तीन वर्षार्ंपासून तक‘ारी सुरू आहेत. परंतु शासनच कानाडोळा करीत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. ‘त्या’ शिक्षकावर योग्य ती कारवाई करण्यासाठी 2021 पासून वैभव मनोहर अंभोरे पाठपुरावा करत आहेत. या तक‘ारीची पुसद नप प्रशासन दखल घेऊनही कारवाई करत नसल्यामुळे थेट मु‘यमंत्र्यांकडे तक‘ार करून त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. गजानन भोपाजी अंभोरे असे या सध्या नपच्या नोकरीत असलेल्या त्या शिक्षकाचे नाव आहे. तो 1993 मध्ये नप शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला होता. जवळपास 30 वर्षार्ंपासून तो नप शाळेत सहायक शिक्षक म्हणून नोकरी करत आहे.
गजानन अंभोरेने एका मुलाचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाची दिशाभूल करून उत्पन्नाचा दाखला मिळवून शिष्यवृत्ती हडप केली. तशाच पद्धतीने दुसरा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून वाशीम येथे होमिओपॅथीचे शिक्षण घेत आहे. शिक्षक अंभोरे याने 2020-2021 मध्ये पुसद तहसील कार्यालयामध्ये मुलाच्या शिक्षणाकरिता उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला. त्या अर्जामध्ये शासनाची दिशाभूल करणारे पुरावे सादर करून ‘86 रुपये महिन्याऐवजी’ ‘वार्षिक 30 हजार रुपये’ उत्पन्न असल्याचे दाखविले. नप शाळेतील शिक्षक गजानन अंभोरे याने शासनाची दिशाभूल करून उत्पन्नाचा दाखला मिळवल्याची तक‘ार वैभव अंभोरे यांनी डिसेंबर 2021 मध्ये केली होती. त्यानंतर पुसद तहसील कार्यालयात 21 डिसेंबर 2022, उपविभागीय अधिकारी व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात 15 डिसेंबर 2022 आणि जिल्हाधिकारी व धर्मदाय आयुक्तांकडे 21 डिसेंबर 2022 रोजी तक‘ारी केल्या आहेत.
शासकीय नोकरीत असून भरमसाठ कमाई
गजानन अंभोरे शासकीय नोकरीवर असून त्याला मासिक 86 हजार रुपये पगार मिळतो. दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे 20 एकर शेती आहे. त्यासोबतच श्री मुंगसाजी महाराज संस्थान येथे मु‘य सचिव आणि नप कर्मचारी पतसंस्था येथे सचिव असल्याचे आपल्या तक‘ारींमध्ये वैभव अंभोरे यांनी नमूद केलेले आहे.
आधी तहसीलदारांनी कारवाई करावी
शिक्षक गजानन अंभोरे याने उत्पन्न दाखल्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची शहानिशा करून उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक होते. त्यामुळे तहसीलदारांनी शासनाची दिशाभूल केल्याबद्दल कारवाई करायला पाहिजे. त्यांच्याकडून तसा अहवाल आमच्याकडे आल्यावर आम्हीसुद्धा कारवाई करू, असे पुसद नप मु‘याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांनी स्पष्ट केले.
नपला कारवाईसाठी पत्र पाठवू
नपचा शिक्षक गजानन आंभोरे संदर्भात तहसील कार्यालयाकडे तक‘ार आहे. त्याने 30 हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळवला आहे. त्याने दिलेली माहिती शासनाची दिशाभूल करणारी आहे. त्याने पत्नीच्या घटस्फोटाचीही माहिती बाँडपेपरवर दिलेली आहे. त्याला कोर्टामार्फत घटस्फोट झाल्याचे कागदपत्र मागितले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्याला दुसरे स्मरणपत्रही पाठविले आहे. दोन-तीन दिवसांत त्याच्याकडून उत्तर न मिळाल्यास नपला कारवाई करण्यासाठी पत्र पाठवू, असे पुसद तहसीलदार एकनाथ काळबांडे यांनी सांगितले.