सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. house cool सध्या एप्रिल महिन्यातच प्रचंड उष्णता आहे. या गर्मीपासून सुटका मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही न काही उपाय करून गारवा शोधात असते. एसी, कुलरचा वापर ही मर्यादित करावा लागतो. पण, या सर्वांच्या पलीकडे जाऊन नैसर्गिक पद्धतीने आपले घर व आपल्या आजू बाजूचे परिसर थंड ठेवण्यासाठी काही उपाय आपण करू शकतो.
झाडांचा वापर करा:-
जिथे हिरवळ म्हणजेच झाडं house cool असतात तिथल्या वातावरणात नेहेमी थंडावा असतो, हिरवळ थंडावा देण्यासोबतच आपल्या मनाला शांत देखील ठेवले. म्हणून ह्या उन्हाळ्यात आपल्या घराची रूपरेखा जरा बदला आणि त्यात झाडांना प्राधान्य द्या. ह्यासाठी तुम्ही तुमच्या लिविंग रूमध्ये हिरव्या झाडांचा समावेश करू शकता. छाने तुमचं घर थंड आणि प्रसन्न राहिल.
योग्य लाईट्स:-
उन्हाळ्यात त्या गोष्टींपासून house cool आवर्जून दूर राहिलं पाहजे ज्या उष्णता वाढवतात. जसे की घरातील लाईट्स, गरज नसताना घरातील लाईट्स बंद ठेवावे. कारण लाईट्स मधून उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्या घरातील तापमान वाढू शकतं. आणि तसेही गरज नसताना लाईट्स बंद ठेवल्याने तुमचे विजेचे बिल देखील कमी येईल. तसेच घरात चुकीच्या लाईटसचा वापर टाळा. म्हणजे पिवळ्या बल्ब एवजी LED किंवा CF. लाईट्सचा वापर करा.
रंगाची निवड:-
पांढरा रंग हा उष्णतेला house cool परावर्तित करतो हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. पांढरी छटा असलेला रंग हा सूर्याच्या अतिनील किरणांना शोषून न घेता त्यांना परावर्तीत करतो त्यामुळे उन्हाळ्यात आपण पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे जास्त वापरतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात आपल्या घरासाठी देखील हलक्या रंगाचा वापर करा. तसेच बाहेरच्या भिंतींवर लाईम वॉश किंवा परावर्तीत पांढरा पेंट लावा. ह्याने तुमच्या घराच्या भिंती सूर्याच्या किरणांची उष्णता शोषून न घेता ते परावर्तीत करतील.
सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात स्वतःला नेहेमी हायड्रेटेड ठेवा, टरबूज, काकडी हांसारख्या शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करा. जास्तीत जास्त पाणी प्या. ज्यामुळे बाहेर कितीही उष्णता असली तरी तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही.