तभा वृत्तसेवा
भंडारा,
Upsa Sinchan Yojana : धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि मोहाडी तालुक्यांतर्गत सांगवारी, सुरेवाडा आणि काटी/खामारी या महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित कामांना गती देण्यासाठी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी 14 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले असल्याचे फुके यांनी सांगितले.