दादा इदाते यांचा सोमवारी सत्कार

bhikuji dada idate भटके- विमुक्तांचे प्रश्न व उपाय

    दिनांक :15-Apr-2023
Total Views |
नागपूर, 
 
bhikuji dada idate वैयक्तिक प्रगतीच्या संधीकडे पाठ फिरवून, विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिलेल्या समाजासाठी जीवन समर्पित करणारे मोजकेच असतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकूजी उर्फ दादा इदाते हे त्यापैकीच एक आहे. bhikuji dada idate त्यांच्या याच कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करुन त्यांचा सन्मान केला. त्यानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग तसेच भारतीय खेळ प्राधिकरणाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातर्फे विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त दादा इदाते यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता व्यवसाय प्रबंधन विभागाचे सभागृह, विद्यापीठ क्रीडा परिसर, अमरावती रोड येथे करण्यात आले आहे.
 
 
idate
 
bhikuji dada idate याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. संजय दुधे भुषविणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे व विशेष अतिथी म्हणून रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य वामनराव तुर्के उपस्थित राहणार आहे. याशिवाय प्रमुख उपस्थिती रातुम नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सदस्य डॉ. धनंजय वेळुकर यांची आहे.
 
 
सर्वत्र दादा इदाते bhikuji dada idate या नावाने परिचित असणारे दादा यांचा जन्म २ जून १९४९ रोजी टेटवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे झाला. बी. एसस्सी, बी. एड. डी. फॉर्म पर्यंत त्यांचे शिक्षण झाले. देशभर पसरलेल्या भटके व विमुक्तांसाठी एका राष्ट्रीय आयोगाची स्थापना करावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सामाजिक दृष्ट्या भटकंती करणारे शालेय व शाळाबाह्य मुलांना खेळाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी तसेच या मुलांना समाजाच्या मुख्य विकास प्रवाहात आणून खेळाच्या माध्यमातून विषमतेचा अंधार दूर करण्यासाठी नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात हा पुढाकार घेतला आहे. bhikuji dada idate दादा इदाते यांच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम विद्यापीठाचा क्रीडा विभाग सध्या राबवित आहे. यात जवळपास नागपूरसह, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातून आठशे पैकी १०० मुलांची निवड अ‍ॅथ्लेटिक्स, फुटबॉल, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कराटे, टेबलटेनिस या खेळाच्या प्रशिक्षणासाठी झाली आहे.
 
 
bhikuji dada idate दादा इदाते यांची भारत सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बंधुत्व व समरसता दिन म्हणून साजरा करण्याच्या समितीत सदस्य म्हणून त्यांची निवड केली होती. भारत सरकार नियुक्त केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्धभटक्या जमाती कल्याण आणि विकास मंडळाच्या अध्यक्षपदी ते होते. याशिवाय विविध समित्यांमध्ये त्यांनी सक्रिय काम केले आहे. भटके- विमुक्तांचे प्रश्न व उपाय यासह त्यांची एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहे. याशिवाय विविध लेखही त्यांचे प्रकाशित झाले आहे.
 
 
मधुकरराव देवल सामाजिक पुरस्कार bhikuji dada idate त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय स्वामी विवेकानंद सेवा सन्मान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पुरस्कार, राष्ट्रीय गौरव पुरस्कार, नवी दिल्ली, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम, राष्ट्रीय गौरव पुरस्कार, अटल समाज भूषण पुरस्कार असे एकून १९ पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहे. कार्यक्रमास सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी केले.