सीएम योगींना कर्नाटकातही Z+ सुरक्षा!

17 Apr 2023 16:18:22
लखनऊ,
गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ CM Yogi security यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएम योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवली जाऊ शकते. मागील वर्षीही गोरखनाथ मंदिरावरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि त्यांच्या संरक्षणात केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तैनात करण्यात आले होते.
 
 
gfyh  
 
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ CM Yogi security यांना आधीच झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. हा सुरक्षा कठडा आणखी कडक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सीएम योगी यांची सुरक्षा उत्तर प्रदेशाबाहेरही वाढवण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी यांना स्टार प्रचारक बनवले आहे. राज्यातील नेत्यांच्या वतीने मुख्यमंत्री योगी यांच्या सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील घटनांना झपाट्याने वळण लागल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही सीएम योगी यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0