बघा व्हिडीओ... मृत पक्ष्यांपासून बनविले जातात ड्रोन!

17 Apr 2023 17:43:54
सोकोरो,  
न्यू मेक्सिको इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजीच्या Bird Drone शास्त्रज्ञ मृत पक्ष्यांच्या  मृतदेहाचा वापर ड्रोन बनवण्यासाठी करत आहे. शास्त्रज्ञांच्या या संकल्पनेतून मृत पक्ष्यांना नवीन जीवन दिले जात असल्याची भावना पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत. या प्रकल्पाचे नेतृत्व  करणारे डॉ. मुस्तफा यांनी सांगितले की, आम्ही मृत पक्ष्यांच्या मृतदेहांचे ड्रोनमध्ये रूपांतर केले. आम्ही त्यांना टॅक्सीडर्मी बर्ड ड्रोन असे नाव दिले आहे. पक्ष्यांच्या उड्डाणाची पद्धत काय आहे हे समजावे म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. भविष्यात विमान वाहतूक उद्योगासाठी हे उपयुक्त ठरू शकते. 
 
 
 
dr
 
 
Bird Drone संग्रहालयात सिंह, बिबट्या, वाघ इत्यादींचे पुतळे तुम्ही अनेकदा पाहिले असतील परंतु, न्यू मेक्सिकोच्या सोकोरो शहरात मृत पक्ष्यांचे पुतळे ठेवण्यात आले. या पुतळ्यांचे जतन करण्याच्या प्रक्रियेला टॅक्सीडर्मी म्हणतात. यामुळे मृत प्राण्यांचे शरीर सुरक्षित राहते. पण त्यांच्या आत कोणतेही अवयव नाहीत. पीएचडी संशोधक ब्रॅन्डन हार्केनॉफ, डॉ. मुस्तफा यांच्यासोबत काम करतात, ते म्हणाले की मृत पक्ष्यांचे शरीर हलके असते. आत कोणताही अवयव नाही त्यांना ड्रोन बनवून उडवता आले तर कुणाला कळणारही नाही तो खरा पक्षी आहे की ड्रोन. हार्केनॉफ पक्ष्यांच्या रंग आणि उड्डाण क्षमतेवर संशोधन करत आहेत. ब्रॅन्डन हार्केनॉफ म्हणाले की पक्ष्यांच्या रंगावरून ते कोणत्या मादी किंवा नराशी नाते निर्माण करतील हे दर्शविते. अशा परिस्थितीत, कोणत्या प्रकारच्या रंगांचा उड्डाणावर थेट परिणाम होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. आम्ही आता बनवलेले टॅक्सीडर्मी बर्ड ड्रोन जास्तीत जास्त 20 मिनिटे उडू शकतात. आता पुढच्या टप्प्यात शास्त्रज्ञ या ड्रोन पक्ष्याची ती आवृत्ती तयार करतील, जो दीर्घकाळ उडू शकतो. याची चाचणी जिवंत पक्ष्यांमध्ये केली जाईल, जेणेकरून नैसर्गिक खुल्या भागात राहणाऱ्या पक्ष्यांना या ड्रोन पक्ष्यांमुळे कोणतीही अडचण येऊ नये. 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0