रिसोड,
Teacher Molested : रिसोड शहरातील एका नामांकित शाळेत स्वतःच्या वर्गात शिकत असलेल्या एका ११ वर्षीय अल्पवनीय मुलीचा त्याच वर्गातील शिक्षकाने विनभंग केल्याचा प्रकार १८ एप्रिल रोजी समोर आला.
याबाबत पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Teacher Molested) पिडीताच्या वडिलांनी रिसोड पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची अल्पवयीन मुलगी रिसोड शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. शिक्षकाने तिला १८ एप्रिल रोजी शाळेत कविता म्हणण्यास सांगितले. कविता म्हणत असताना शिक्षकाने तिचा विनयभंग केला. सदर प्रकार हा पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या आईला रडत रडत सांगितला सदर शिक्षकाने यापूर्वीही चार-पाच वेळा असे केले असल्याचेही पिडीताने आपल्या आईजवळ कथन केले. पिडीताच्या वडिलांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षक ए. बी. देशमुख यास अटक केली आहे. या घटनेने येथील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेंद्र गवई सदर प्रकरणाचा तपास करीत आहे.