भोपाळ,
शहडोलजवळ दोन रेल्वे मालगाड्यांची टक्कर train accident झाली ज्यात दोन लोको पायलटचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी आहेत. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. टक्कर झाल्यानंतर मालगाडीच्या पॉवरला (इंजिन) आग लागल्याने लोकोपायलटचा जळून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. रेल्वे व्यवस्थापनाचे स्थानिक पातळीवरील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, train accident सध्या शहडोल पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. राजेश प्रसाद गुप्ता असे अपघातात प्राण गमावलेल्या लोको पायलटचे नाव आहे. पालिकेचे अग्निशमन दल आणि रेल्वेच्या बचाव पथकाने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर लोको पायलटचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले असून, एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम होत आहे.
सिंगपूरजवळ train accident झालेल्या अपघातामुळे संपर्क क्रांती कटनी ते बिलासपूर, चिरमिरी कटनी मेमो, अंबिकापूर जबलपूर, बिलासपूर कटनी मेमू, बिलासपूर शहडोल लोकल, नर्मदा इंदोर बिलासपूर, बरौनी गोंदिया या गाड्यांसह सुमारे अर्धा डझन गाड्या प्रभावित झाल्या आहेत. तिथेच, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन शहडोल रेल्वे स्थानकातून त्यांच्या इच्छित स्थळी बसेस नेण्याची सोय करत आहेत. सिंगपूर रेल्वे स्थानकाच्या तिसर्या मार्गावर कोळसा भरलेली मालगाडी उभी होती, बिलासपूरहून येणारी मालगाडी रेड सिग्नल ओलांडून मागून धडकली, त्यामुळे ही घटना घडली.