तभा वृत्तसेवा
महागाव,
Groundnut Crop : अज्ञात इसमाने शेतातील भूईमुग पिकावर तणनाशक फवारल्याने शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महागाव तालुक्यातील कलगाव येथील शेतकरी सुशिल नारायण राऊत यांनी आपल्या शेतात रबी हंगामात भुईमुग पिकाची लागवड केली आहे.
पिक ऐन बहारात येवुन फळधारणा चांगल्या पद्धतीने होत असतानाच अज्ञात ईसमाने भूईमुगावर तणनाशक फवारल्याने पिक (Groundnut Crop) जळत आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्या जात असुन राऊत यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक‘ार महागाव पोलिस व कृषी विभागाला दिली आहे. जमादार नारायण पवार, संतोष जाधव, कृषी सहायक मोरे यांनी शेतात जाऊन जळत असलेल्या पिकाची पाहणी करून पंचनामा केला आहे. शेतातील उभे पिक जळत असल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.