रास्ता रोको आंदोलन तूर्त स्थगित

    दिनांक :02-Apr-2023
Total Views |
कारंजा लाड, 
Rasta Roko Andolan : कांरजा - मंगरूळनाथ मार्गावरील शेतकरी निवास पासुन काही अंतरावर रस्त्याच्या दुर्तफा मटन विक्रेंत्यानी अनधिकृतपणे दुकाने थाटुन खुल्या मटन विक्रीचा व्यावसाय सुरू केला आहे. त्यामुळे या परीसरातील स्थानिकांना व रस्त्याने अवागमन करणााया विद्यार्थ्यांना आणि प्रवाश्यांना याचा त्रास होत असून दुर्गंधीमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
Rasta Roko Andolan
 
त्यामुळे पालिका प्रशासनाने हि अनधिकृत मटन दुकाने ३०. मार्चपर्यंत हटवावी अन्यथा ३१ मार्चला बायपास परीसरातील झाशी राणी चौकात महिलांना सोबत घेउन रास्ता रोको करण्याचा ईशारा मनसेचे अनुप ठाकरे यांनी मुख्याधिकाायांना दिलेल्या निवेदनातुन दिला होता. परंतु, मुख्याधिकार्‍यांनी येत्या १५ दिवसात या अनधिकृत मास विक्रीच्या दुकानावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर ३१ मार्चचे रास्ता रोको आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. तसे पत्र मुख्याधिकार्‍यांनी मनसे चे अनुप ठाकरे यांना दिले आहे.
 
 
सदर मांस विक्रीच्या दुकानांवर पोलिस संरक्षणात पुढील १५ दिवसात कारवाई करण्यात येईल तसेच रहीदारीस अडथळा निर्माण होउनये या करीता रास्ता रोको आंदोलन स्थगीत करून प्रशासनास सहकार्य करावे, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे सदर चे रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याची माहिती मनसेचे अनुप ठाकरे यांनी दिली आहे.