राजपथ इन्फ्राकॉनला दणका; 2 कोटी 79 लाख जमा करा

-जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
-46,585 ब्रासचे केेले अतिरिक्त उत्खनन

    दिनांक :22-Apr-2023
Total Views |
अकोला,
शासनाचे आदेश डावलून अवैध गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी Rajpath Infracon उल्हासनगरच्या राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि.कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शुक्रवार 21एप्रिल रोजी 2 कोटी 79 रुपयांचा भरणा करण्याचा आदेश दिला. परवानगी विना या कंपनीने एकूण 46,585 ब्रास गौणखनीजचे उत्खनन केले होते. मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव व वडगाम कुरुममध्ये अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात आले.
 
 
 
vyg
 
 
 
उल्हासनगरच्या राजपथ इन्फ्राकॉन Rajpath Infracon प्रा.लि.च्या प्रोजेक्ट मॅनेजरने मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे वडगाव येथील गट क्रमांक 118, 119, 114, 107, 110 मध्ये शासनाच्या परवानगी विना जास्तीचे गौण खनिज उत्खनन केल्याची तक्रार मूर्तिजापूरच्या आमदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या तक्रारीवर शुक्रवार 21 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सुनावणी घेतली व शेवटी संबंधित कंपनीला 30 दिवसांच्या आत उपरोक्त रक्कम जमा करण्याचा आदेश दिला.