पुसदच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये हृदयाची बायपास सर्जरी यशस्वी

    दिनांक :22-Apr-2023
Total Views |
पुसद, 
येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये अद्ययावत पद्धतीने हृदयावरील बायपास शस्त्रकि‘या (बिटिंग हार्ट सर्जरी) नुकतीच यशस्वीपणे पार पडली. Pusad's Medicare Hospital मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दगडू मोटे (वय 60, महावीरनगर, पुसद ) यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांची स्थिती अतिशय गंभीर होती. रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ‘कोड ब्ल्यू’ घोषित करण्यात आला. कोड ब्ल्यूचा अर्थ दोन मिनिटांत डॉक्टरांची एक चमू पाचारण करण्यात येते. दोन मिनिटांत सर्व डॉक्टर्स आवश्यक साधनांसह रुग्णाजवळ गोळा झाले.
 
 
 
sarjari
 
या पाच डॉक्टरांच्या चमूचे नेतृत्व अतिदक्षता विभागातील तज्ञ करतात. या रुग्णासाठी हृदयरोग तज्ञ डॉ. संजय अग‘वाल यांनी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ‘जीवन संजीवनी’चा वापर केला. यावेळी कार्डिअ‍ॅक मसाज आणि रिससिटेशन करण्यात आले. छातीवर विशिष्ट दाब तसेच डीसी शॉक देऊन रुग्णाचे हृदय पूर्ववत सुरू करण्यात यश मिळाले. तथापि, रुग्ण बेशुद्धावस्थेत होता. व्हेंटिलेटरचा उपयोग करून कृत्रिम श्वसन देऊन रुग्णाचा श्वासोच्छ्वास सुरू करण्यात आला व रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. रुग्णाची हृदयाची क्षमता कमी झालेली होती. अशावेळी रुग्णासोबतच्या आप्तांचे समुपदेशन करण्यात आले. रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा विकार दहा वर्षार्ंपासून होता. Pusad's Medicare Hospital त्यामुळे हृदयविकाराच्या निदानासाठी मेडिकेअर कॅथलॅबमध्ये अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात तीनही रक्तवाहिन्या अवरुद्ध झाल्याचे आढळून आले. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये जवळपास नव्वद टक्के ब्लॉकेजेस आढळले. त्यामुळे हृदयाची बायपास शस्त्रकि‘या करण्याचा तत्काळ निर्णय घेऊन त्वरेने कार्यवाही करण्यात आली.
 
 
Pusad's Medicare Hospital मेडिकेअर हॉस्पिटलमधील सुसज्ज मॉड्युलर शस्त्रकि‘या दालनात बायपास सर्जरी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. नागपूरचे वि‘यात हृदय शल्यविशारद डॉ. पंकज पोहेकर व त्यांची तज्ञ चमू, भूलतज्ञ डॉ. आनंद कोमावार, सर्जन डॉ. विक्रांत लोहकरे व त्यांचे सहकारी, डॉ. वीरेन पापळकर, डॉ. संजय अग्रवाल व डॉ. सतीश चिद्दरवार यांच्या सहकार्याने ही अवघड, क्लिष्ट व जोखमीची शस्त्रकि‘या यशस्वीरीत्या पार पडली. मृत्यूच्या दाढेतील हा रुग्ण सुखरूप हृदयविकाराच्या संकटातून बाहेर पडून त्याला अक्षरश: जीवदान मिळाले. विशेष म्हणजे हृदय सुरू असताना अशी शस्त्रक्रिया करणे अतिशय जोखमीचे असते. मात्र प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अत्याधुनिक पद्धतीने बिटिंग हार्ट बायपास सर्जरी करण्यात डॉक्टरांना मोठे यश प्राप्त झाले. पुसदसारख्या तालुक्याच्या ठिकाणी रुग्णावरील बायपास सर्जरी यशस्वी झाल्याने मेडिकेअरच्या डॉ. पापळकर, डॉ. अग‘वाल व डॉ. चिद्दरवार आणि चमूचा आत्मविश्वास वाढून नवीन ऊर्जा प्राप्त झाली. महात्मा ज्योतीराव फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजनेत अशा शस्त्रकि‘या सुविधेचा गोरगरिबांना लाभ मिळत आहे, ही मोठी उपलब्धी पुसद सार‘या ठिकाणी मिळाल्याने सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.