जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत दुहेरी लढतीची शक्यता

-वर्चस्वासाठी राजकीय नेते सज्ज

    दिनांक :22-Apr-2023
Total Views |
अकोला,
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार market election समितीची निवडणूक तोंडावर आली असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर सातही बाजार समित्यांमधील होणार्‍या लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या सहकार पॅनेलतर्फे आघाडी करून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सध्या चित्र असून तसे झाल्यास जिल्ह्यातील त सर्व बाजार समितीमध्ये दुहेरी लढती होण्यार असल्याचे बोलले जात आहे.

vty
अकोला,market election जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या अकोला बाजार समितीमध्ये 18 जागांसाठी एकूण 31 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथे सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात एकूण 16, ग्रामपंचायत मतदारसंघात आठ, व्यापारी व अडते पाच आणि हमाल व माथाडी मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज कायम आहेत. मूर्तिजापुरात दोन अविरोध; 44 उमेदवार लढतीतमूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी व्यापारी मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतली. त्यामुळे दोन जागांसाठी दोनच अर्ज शिल्लक राहिल्याने ते अविरोध झाले आहेत. उर्वरित जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत.येथे सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून 32 पैकी 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 22 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात 31 अर्जांपैकी 15 जणांनी माघार घेतल्याने 17 उमेदवार रिंगणात आहेत. हमाली माथाडी मतदारसंघात सहा पैकी एक अर्ज मागे घेण्यात आल्याने पाच उमेदवार रिंगणात आहेत.
पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सेवा सहकारी संस्था मतदार संघातील 59 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 19 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले असून, आता 40 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवणार आहेत. 17 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत वर्चस्व स्थापन करण्यासाठी सहकार पॅनेल, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आघाडी केली आहे. या आघाडीच्या विरोधात तेथील शेतकरी पॅनेल निवडणूक लढविणार असल्याने पातुरात एकास एक अशी लढत होणार आहे. येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना हमाल मापारी मतदार संघातून दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यात एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे हमाल मापारी संघातून शेख मुख्तार शेख नजीम अविरोध झाले आहेत.
बाळापूरमध्ये 35 उमेदवारांची माघार, एक अविरोध बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण 73 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी 35 जणांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे आता येथे 38 उमेदवार रिंगणात आहेत. सेवा सहकारी सोसायटी गटात एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून हमाली व माथाडी मतदारसंघात एकच अर्ज असल्याने तो उमेदवार अविरोध निवडून आला आहे. व्यापारी अडते मतदारसंघात एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत.